साळी समाज संस्था कार्यकारिणीची वार्षिक सभा संपन्न…..

प्रतिनिधी : जळगाव जिल्हा समस्त साळी समाज संस्था कार्यकारणी आयोजित जळगाव जिल्हातील व तालुक्यातील पदाधिकारी व समाजसेवक बंधू-भगिनींची वार्षिक सभा संपन्न झाली. पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे आयोजित सभेत अखिल महाराष्ट्र प्रांतिक 5 व्या अधिवेशना निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील नियोजित समितीने या सभेत मार्गदर्शन केले. सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष पंडित साळी यांनी भूषविले. व्यासपीठावर विद्यमान अखिल महाराष्ट्र सरचिटणीस भालचंद्र साळी, स्वागत समिती अध्यक्ष उदय दुधाने, उद्योगपती प्रशांत पांढरपट्टे, दिलीप पोरे, अनिल भंडारे, प्रकाश भंडारे, ठाणे माजी जिल्हाध्यक्ष उदय साळी, जळगाव युवक मंडळ अध्यक्ष राजेश खेडकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष आढाव, कोषाध्यक्ष दिलीप मुंदानकर, अखिल महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष सौ शोभा गाढवे, उद्योगपती प्रताप साळी उपस्थित होते.
सुरुवातीस श्री जिव्हेश्वर व संतश्रेष्ठ योगी पुरुष श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या प्रतिमा पूजन होऊन सभेचे प्रास्ताविक सुभाष आढाव यांनी केले. अधिवेशन दौरा निमित्त प्रास्ताविक पोरे यांनी केले. अधिवेशन बाबत माहिती भालचंद्र साळी यांनी विदित केली, अधिवेशनात होणाऱ्या कामकाजाची रूपरेषा प्रशांत पांढरपट्टे यांनी दिली. उदय साळी यांनी आतापर्यंत झालेल्या अधिवेशन बाबत तपशील सांगितला. प्रताप साळी यांनी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. जळगाव शहर समाजाने नुकतीच जागा खरेदी केली असून त्या ठिकाणी भव्य सभागृह उभारणी साठी युवक अध्यक्ष राजेश खेडकर यांनी आवाहन केले. अधिवेशन स्वागत समिती अध्यक्ष उदय दुधाने यांनी अधिवेशना साठी केलेली तयारी, पुढील पाच वर्षाचे नियोजन आणि रूपरेषा कथन केली. या अधिवेशनासाठी सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करावे व अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. जिल्हा कार्यकारी सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांचा यथोचित सन्मान केला गेला. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत बंधू-भगिनींचा देखील सत्कार यावेळी केला गेला. यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक प्रताप साळी, दादा पवार, नायब तहसीलदार पदोन्नती प्राप्त गणेश साळी , प्रशांत धनके, पोलीस पुरस्कार प्राप्त किरण धमके, ज्युक्टो संघटना अध्यक्ष नंदन वडींकर, साळी, समाज भवन जागा मिळवून दिल्याबद्दल राजेश खेडकर यांचा सत्कार केला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष आढाव व दिपाली खंडारे यांनी सांभाळले.
सभेचे अध्यक्ष पंडित साळी यांनी जळगाव जिल्ह्यातील समाजाची आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती विषद केली. जिल्हा कार्यकारणी अनेक उपक्रम यशस्वीपणे असून आगामी अखिल महाराष्ट्र प्रांतिक अधिवेशन आपण सर्व मिळून यशस्वी करूया असे आश्वासन दिले.
या सभेत ज्येष्ठ समाज बांधव सुभाष बी धमके, जगदीश साळी, अनिल अढाव, संजय साळी, सुनील साळी , बाळकृष्ण भुरे , सुधीर खंडारे, गणेश साळी, मनोज आढाव, आनंद साळी, सौ ललिता पंडीत साळी, सौ संगीता सुभाष आढाव, सौ. दिशा मुंदानकर, सौ वर्षा भुरे, सौ स्वरा पेंढारे किशोर खंडारे, डॉ. पेंढारे, दिलीप पेंढारे, सौ रेखा पेंढारे, मिलिंद साळी, फलटणकर, आखडकर इ. बंधू-भगिनी मोठ्या संख्येने हजर होते अल्पोपहार व चहापान व्यवस्था गणेश नाना भोगरे यांनी सांभाळली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिलीप मुंदाणकर यांनी केले.





