जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री दादाजी धूनिवाले प्रतिष्ठानच्या नूतन कार्यकारिणी निवड जाहीर.

एरंडोल प्रतिनिधी- येथून जवळच असलेल्या सांगवी येथे तीर्थक्षेत्रीय वर्ग (क) असलेल्या श्री दादाजी धूनिवाले प्रतिष्ठानच्या सभागृहात जेष्ठ माजी अध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत प्रतिष्ठानच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी म्हणून प्रदिप लक्ष्मण पाटील, उपाध्यक्षपदी अँड मोहन बन्सीलाल शुक्ला तर सचिवपदी अँड किशोर दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या कामकाजासाठी नूतन विश्वस्त सदस्य मंडळ म्हणून अविनाश रामकृष्ण जडे,फकीरा पुरण खोकरे,संदीप सुरेश पाटील, दीपक दिलीप वाघ, अनिल बारकू पाटील, विठ्ठल मांगो बडगुजर, संजय फिरके ,चंद्रभान गोकुळ पाटील, राजेंद्र शांताराम पाटील ,जगदीश भगवान पाटील, चंद्रकांत दामू चौधरी ,छोटू सिताराम पाटील यांची देखील निवड करण्यात आली आहे.
ही नुतन कार्यकारणी सन २०२६ ते २०३१ पर्यंत पाच वर्षासाठी असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नूतन निवड झालेल्या कार्यकारिणीने गुरुमाऊली श्री सेवानंदजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने तीर्थक्षेत्राचा विकास, भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि धार्मिक कार्य अधिक गतिमान करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी नूतन कार्यकारी पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त, सेवेकरी व दादाजी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button