‘रोटरी क्लब ऑफ एरंडोल’तर्फे आयोजित महाआरोग्य लिव्हर तपासणी व फायब्रोस्कॅन शिबीर

एरंडोल, (प्रतिनिधी): – रोटरी क्लब ऑफ एरंडोलच्या वतीने एरंडोल शहरात ‘महाआरोग्य शिबीर – लिव्हर (यकृत) तपासणी व फायब्रोस्कॅन शिबीर’ उत्साहात पार पडले. “तुमचे लिव्हर निरोगी आहे का? आजच खात्री करा!” या उद्देशाने आयोजित या शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये व मोलाचे मार्गदर्शन:
एरंडोल तालुका परिसर व जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमच हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात अत्याधुनिक फायब्रोस्कॅन (FibroScan) तपासणीद्वारे फॅटी लिव्हर, फाइब्रोसिस व सिरॉसिसचे अचूक व कोणत्याही सुई किंवा वेदनेशिवाय (Non-Invasive Test) निदान करण्यात आले. यासाठी एरंडोल शहरातील नागरिकांना केवळ ३००/- रुपये इतक्या अल्प तपासणी शुल्कात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, ज्याचा बाजारभाव साधारणतः ३०००/- ते ४०००/- रुपये एवढा होता. तज्ज्ञ डाॅक्टरांच्या माध्यमातून उपस्थितांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला.
सहभागी रुग्णालये व सहकार्य:
बोह्ररी क्लिनिक, म्हसावद नाका, एरंडोल येथे आयोजित या शिबिराला एरंडोल शहरातील नामांकित रुग्णालयांचे विशेष सहकार्य लाभले.
यामध्ये:
- नचिकेता सोनोोग्राफी केंद्र (डॉ. गीतांजली ठाकूर)
- बोहरी क्लिनिक (डॉ. फरहाज बोहरी व डॉ. अंबरीन बोहरी)
- श्री दत्त हॉस्पिटल (डॉ. देवेश वाघ)
- पद्मालय हॉस्पिटल (डॉ. राहुल वाघ)
- माऊली हॉस्पिटल (डॉ. मुकेश चौधरी)
- पाटील हॉस्पिटल (डॉ. आसावरी पाटील व डॉ. उमेश पाटील)
या हॉस्पिटल ने जास्तीत जास्त गरजू व्यक्तींपर्यंत या शिबिराची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ एरंडोलचे अध्यक्ष डॉ. अनिल लोहार, सचिव डॉ. सोपान साळुंखे, सनदी अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, ॲड. ओम त्रिवेदी, अमितदादा पाटील, अरुण कुमार माळी, तसेच मेडिकल कमिटीचे चेअरमन डॉ. मुकेश चौधरी, रोटरी सदस्य हेमंत शर्मा, महेंद्र चौधरी, शेखर पाटील, संदीप जाखीटे, ज्ञानेश्वर महाजन, भूषण बियाणी, तुषार माने, ॲड.चंद्रकांत पारखे, कृष्णा धनगर, राहुल शिंपी, मधुकर देशमुख, योगेश काबरा, सचिन जैन, उल्हास लड्डा, महेश देवरे, गणेश बडगुजर, विजय पाटील, विशाल लाठी, आनंद दाभाडे, जितेंद्र पाटील, योगेश सूर्यवंशी, दीपेश ठाकूर, पपिंदरसिंग सैनी, विलास काबरा, यांच्यासह रोटरीच्या महिला सदस्या, डॉ.गीतांजली ठाकूर, प्रा.सौ. राखी पाटील, डॉ. प्रा.स्वाती शेलार, डॉ. प्रियांका वाघ, डॉ. आसावरी पाटील, डॉ. प्रीती चौधरी, डॉ. मोहिनी वाघ, डॉ. जुमाना बोहरी, सौ. छाया दाभाडे, सौ. रेखा त्रिवेदी, सौ पौर्णिमा देवरे, सौ.स्वाती काबरा, सौ.नम्रता जाखीटे, सौ.शुभांगी साळुंखे, सौ.पूनम चौधरी, सौ.मधुबाला शर्मा, सौ.कोमल महाजन, सौ.वर्षा बडगुजर, सौ.शिवाली देशमुख, सौ.जयश्री शिंपी, सौ.मेघा ठाकूर या सदस्यांच्या आग्रहामुळे, या नवरात्री काळात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला धरणगाव रोटरी क्लब मधील अध्यक्ष मनोज ठाकरे व रोटरी सदस्य मोठ्या संख्येने या तपासणीसाठी हजर होते. यासह हॉस्पिटल मधील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या निमित्ताने एरंडोल शहर व तालुका परिसरातील 120 महिला व पुरुष नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.




