अपघातजळगावमहाराष्ट्र

ग.स.सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हजेरी लावून एरंडोलला परतणाऱ्या प्राथमिक शिक्षकाचे अपघाती निधन………….!

प्रतिनिधी एरंडोल – येथील आनंद नगर मधील रहिवासी सचिन रघुनाथ पाटील ( वय ५२ वर्षे) हे जळगाव येथे ग.स.सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हजेरी लावून दुचाकीने एरंडोलला परत येत असताना अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.ही घटना रविवारी १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एरंडोल पासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या हाॅटेल गौरी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली.या दुर्घटनेत ठोस देऊन अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला.जळगांव येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सचिन पाटील यांची उपचारादरम्यान सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पार्थिवावर एरंडोल येथे मंगळवारी १५ सप्टेंबर २०२६ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सचिन पाटील हे सामाजिक कार्यकर्ते दिलीप आत्माराम महाजन यांचे भाचे होते.तर युवा नगरसेवक प्रशांत ( मयुर ) महाजन यांचे आतेभाऊ होते.सचिन पाटील हे उत्राण येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेत होते.त्यांच्या पश्चात आई, पत्नी,२ मुले असा परिवार आहे.ते ग.स.सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दुचाकीने जळगांवला गेले होते.सभेला हजेरी लावून घरी परतत असताना त्यांच्यावर क्रूर काळाने अपघातात झडप घातली.कुटुंबातील कर्ता पुरुषाचे आकस्मिक अपघाती निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत रात्री उशिरापर्यंत काही एक नोंद झाली नव्हती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button