जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेवा संकल्प अभियानाची सुरुवात….. ,सफाई कामगारांच्या सेवा, कल्याण, आरोग्य व सुरक्षिततेबाबत एरंडोल नगरपरिषदेची आढावा बैठक संपन्न….

प्रतिनिधी  – साफसफाई कामगारांच्या सेवा, कल्याण, आरोग्य व सुरक्षिततेच्या अनुषंगाने त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मा. मुकेशजी सारवान यांच्या अध्यक्षतेखाली एरंडोल नगरपरिषद येथे आढावा बैठक पार पडली.

या बैठकीच्या प्रारंभी आजपासून सुरू करण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ मा.  मुकेशजी सारवान यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासोबतच सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा व कल्याणासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

त्यानंतर नगरपरिषदेच्या कर्मवीर अभ्यासिका येथे सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सफाई कामगारांच्या सेवा-सुविधा, शासन निर्णयानुसार असलेल्या तरतुदी, आरोग्य व सुरक्षितता, तसेच त्यांच्या सेवेशी संबंधित विविध प्रलंबित व आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. यासोबतच नगरपरिषदेतील इतर कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांवरही चर्चा करून त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.

श्रम साफल्य योजना, लाड पागे समिती व अनुकंपा नियुक्तीचा आढावा

सदर आढावा बैठकीमध्ये एरंडोल नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘श्रम साफल्य योजनेची तसेच लाड पागे समितीच्या शिफारशींनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती आयोगाच्या उपाध्यक्षांना देण्यात आली. तसेच अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची माहिती , त्यांच्या सेवेशी संबंधित बाबी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा देखील सविस्तर आढावा घेण्यात आला.

सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजना व सेवा-सुविधांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करणे, तसेच त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या कार्याचे कौतुक

सदर आढावा बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मा.  मुकेशजी सारवान यांनी एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल यांच्या कार्याचे कौतुक केले. सफाई कामगारांच्या सेवा, कल्याण व विविध प्रशासकीय बाबींच्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  अमोल बागुल यांनी केली. त्यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या सेवा, कल्याण, आरोग्य व सुरक्षिततेसाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती उपस्थितांना दिली. 

सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या सेवा, आरोग्य, सुरक्षितता व कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण व त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रशासन आणि संबंधित आयोग यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही आढावा बैठक महत्त्वपूर्ण ठरली.                             

यावेळी मा. मुकेशजी सारवान, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबई, मा. राजेशजी सोनवणे, विशेष कार्यकारी अधिकारी अरविंद मानकरी ,  मा. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर , उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी; मुख्याधिकारी  अमोल बागुल ,  माजी उपनगराध्यक्ष  शालिकभाऊ गायकवाड ,  सामाजिक कार्यकर्ते  आनंद दाभाडे , नगरसेविका तथा आरोग्य सभापती सौ. शारदा मराठे ,  नगरसेवक  अमोल तंबोली व  नितेश चौधरी , तसेच  पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी एरंडोल नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी हितेश जोगी  यांनी केले तसेच कार्यक्रमाचे नियोजन कार्यालय अधीक्षक एस. आर. ठाकूर व आरोग्य निरीक्षक श जीवन जाधव, शहर समन्वयक  विवेक कोळी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button