पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा…..
प्रतिनिधी – येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे नुकताच वर्धापन दिन दिन सरस्वती कॉलनी मध्ये अतिशय आनंदात पार पडला. सुरुवातीला साने गुरुजी लिखित “खरा तो एकाचे धर्म” ही प्रार्थना सर्वांनी म्हटली, कार्यक्रमाच्या अध्यक्षा कृष्णा हॉटेलचे संस्थापक यांच्या धर्मपत्नी मंगलामाई कृष्णा धनगर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. मंडळाच्या सहसचिव डॉ. उज्ज्वला राठी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा, मंडळाच्या अध्यक्षा शोभा साळी कडून सत्कार करण्यात आला, तसेच तसेच चहा, बिस्कीट यांच्या प्रायोजक रजनी काळे यांचा मंडळाच्या उपाध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी केला,
शकुंतला अहिरराव यांनी उपस्थित महिलांना प्रबोधनपर मार्गदर्शन करुन मनोगत व्यक्त केले. निता तिवारी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर एक सुंदर एकांकिका सादर केली. निशा ठक्कर यांनी प्रजापिता ब्रहम-कुमारी यांचे शिव बाबांचे महत्व व कार्य सांगितले. सभासंचालन शशीकला पांडे यांनी केले. उपस्थित महिलांसाठी मनोरंजक स्पर्धा घेण्यात २ मिनिटात जास्तीत जास्त फुलवाती बनविणे, व १ मिनिटात पाण्यातून जास्तीत जास्त नाणे काढणे या स्पर्धा लक्षवेधून घेणाऱ्या होत्या. स्पर्धेचे परिक्षण शर्मा मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदा शुक्ला, संध्या चौधरी, निर्मला लाळगे, कुसुम पाटील यांनी पार पाडली. उज्ज्वला देशपांडे यांनी आभार मानले पसायदान इंदिरा पाटील, मंगला पाटील यांनी म्हटले. कार्यक्रमाच्या उपस्थित सर्व भगिनींनी परिश्रम घेतले.





