जळगावमहाराष्ट्रराजकारण

वरिष्ठ उपाध्यक्ष/राज्य समन्वयक जळगाव विभाग’ प्रदेश पदाधिकारीपदी विजय महाजन

एरंडोल (प्रतिनिधी) – येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यक़र्ते विजय अण्णा महाजन यांची वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राज्य समन्वयक जळगांव विभाग प्रदेश पदाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. नुकतेच त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांचेकडून प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विजय अण्णा महाजन यांच्या सामाजिक कार्याची तळमळ, संघटन कौशल्य, पक्षनिष्ठा तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत असलेली बांधिलकी लक्षात घेऊन,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने ’वरिष्ठ उपाध्यक्ष / राज्य समन्वयक जळगाव विभाग’ प्रदेश पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे पत्रात नमुद केले आहे.
राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि डॉ. अनिल जयहिंद राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांच्या मान्यतेने महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्षांचे सृजनशील नेतृत्वात काँग्रेस पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी अशी अपेक्षा पत्राद्वारे व्यक्त केली आहे. तसेच ओबीसी विभागाचे संघटन अधिक मजबूत करावे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडावे, पक्षाचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविणेकरिता सहकार्य करावे तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार संघटन विस्ताराचे कार्य करावे, संघटनात्मक कार्यपद्धती व शिष्टाचार पाळण्याचे आवाहन देखील वरिष्ठांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button