जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त एरंडोल येथे ‘ अंध अपंग प्रगती ट्रस्ट ‘ तर्फे १५ ऑक्टोबर रोजी चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राचे आयोजन……..!

ट्रस्टचे सचिव तात्या पानपाटील व रावसाहेब कांबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती………….!
एरंडोल – येथे अंध कलाकारांचा चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राचे रा.ति.काबरे विद्यालयात १५ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.अंध व गुणवंत कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती द्यावी.असे आवाहन अंध अपंग प्रगती ट्रस्ट संस्थेचे सचिव तात्या पानपाटील व रावसाहेब कांबळे यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरा,रा.ति.काबरे विद्यालयाचे चेअरमन अनिल बिर्ला,संजय महाजन, एरंडोल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.एस.चौधरी,तसेच पदाधिकारी कैलास महाजन,प्रा.शरद महाजन,प्रा.नितीन पाटील, पंकज महाजन, दिपक बाविस्कर,कुंदन परदेशी, नितीन ठक्कर, विज्ञान पाटील,अजय महाजन व क्रांती मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर अंध अपंग कलावंत गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वत्र आपली कला सादर करीत आहेत.या उपक्रमातून मिळणाऱ्या मदत निधीचा विनियोग बेरोजगार अंध व अपंगांच्या कल्याणासाठी होणार आहे.
खंत :- काही सरकारी अधिकारी यांनी मदतीचा हात मागे खेचला.
विशेष हे की दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत अंध व अपंग बांधवांची दिवाळी गोड व्हावी यासाठी नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात पुढे करावा. असे आवाहन करण्यात आले. या साठी आम्हाला अनेक नागरिक , शैक्षणिक संस्था , दुर्गादेवीच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी इतर खर्च कमी करून आम्हाला हात दिला त्या बद्दल सर्वांचे आभार मानले. व काही सरकारी अधिकाऱ्यांनी मदतीचा हात मागे खेचला त्या बद्दल खंत व्यक्त केली.





