जळगावमहाराष्ट्र

एरंडोलच्या धनराज भालेराव यांना ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’

बुलढाणा येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव; जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

प्रतिनिधी : एरंडोल येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ एच. आर. धनराज एस. भालेराव (पिलखेडेकर) यांना निसर्गोपचार क्षेत्रातील कार्याबद्दल ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ प्रदान करण्यात आला. बुलढाणा येथील भातृमंडळ सभागृहात आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी.एम.ए. व योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ज्ञ उपस्थित होते.
यावेळी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, प्रा. डॉ. प्रशांत कपले, गंगाप्रसाद खरात, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, व्हा चेअरमन नितीनराजे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
भालेराव यांना हा सन्मान मिळाल्याने एरंडोलसह जळगाव जिल्ह्यात आनंद व्यक्त होत असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button