जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोल येथील श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य दिनानाथ पाटील यांना ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान………..!

एरंडोल ( प्रतिनिधी ) :- येथील श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य दिनानाथ एकनाथ पाटील यांनी गेल्या २० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम राबविल्याची दखल घेऊन नाशिक येथील ‘ एस्पायर फाऊंडेशन ‘ या सामाजिक संस्थेतर्फे त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली.प्रा.दिनानाथ पाटील यांना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी संजीवनी हाॅल, नांदूर नाका, छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक येथे समारंभ पुर्वक ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ‘ एस्पायर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बबनराव मधुकर वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी नाशिक महानगरपालिकेचे महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,अनेक मान्यवर तसेच किरणताई दिनानाथ पाटील व आदिनाथ दिनानाथ पाटील यांचेसह आप्तेष्ट उपस्थित होते.
श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थाध्यक्ष अमित राजेंद्र पाटील, सचिव कोकीळाताई पाटील, उपाध्यक्ष ॲड.आनंदराव पाटील, ज्येष्ठ संचालक बापू साहेब संजय दिगंबर पाटील,डि.डी.एस.पी.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील, उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर यांनी प्रा.दिनानाथ पाटील हे पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button