जळगावमहाराष्ट्र

पोटदुखीचा आजार व आर्थिक अडचण सोडविण्याचे प्रलोभन दाखवून धर्मांतर करण्याचा अयशस्वी प्रयत्न………..!

एरंडोल येथे पद्मालय फाट्यानजीक उत्तमनगरातील घटनेमुळे प्रचंड खळबळ………‌‌!

प्रतिनिधी एरंडोल – येथे शंकर हिरामण बोरसे,रा.केवडीपूरा,एरंडोल याला पोटदुखीचा आजार व आर्थिक अडचण सोडविण्याचे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी एरंडोल सारख्या ग्रामीण भागात धर्मांतराचे लोण ऐन दिवाळीच्या दिवसात पोहोचल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल पोलीस स्टेशन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडोल येथील शंकर हिरामण बोरसे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.त्याला काही दिवसांपासून पोटदुखीचा आजार आहे.गेल्या आठवड्यात ३० ऑक्टोबर २०२६ रोजी त्याला उत्तमनगरात त्याचा मित्र प्रकाश विक्रम बारेला हा भेटला असता कैलास सहादर बारेला,रा.खाजाजी नाईक आश्रम शाळेजवळ,डाॅ.हेडगेवार नगर, धरणगांव हा प्रत्येक महिन्याच्या सोमवारी किंवा इतर दिवशी येत असतो.उत्तमनगर मधील लोकांना संजय रतन बारेला याचे घरी गोळा करून घराचा दरवाजा बंद करून काहीतरी पुजापाठ करीत असतोअसे सांगितले.याबाबत नेमका काय प्रकार आहे? असे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वस्तीवरील लोकांना ख्रिश्चन धर्मात या तुमचे सर्व आजार व दु:ख दूर होतील तसेच राशन पाणी, मोफत शिक्षण, पैसे पुरविण्याचे आमीष दाखवण्यात आले.वस्तीतील बरेचसे लोक ख्रिश्चन धर्माचे आचरण करीत असल्याचे शंकर बोरसे याला मित्राने सांगितले.माझा पोटदुखीचा आजार बरा होईल का? तसेच मला थोडी आर्थिक अडचण असल्याचे बोरसे याने मित्राला सांगितले.
२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी म्हसावद नाका परिसरात शंकर व प्रकाश यांची भेट झाली असता कैलास बारेला आज एरंडोल येथे संजय बारेला यांचे घरी येणार असल्याची माहिती शंकर बोरसेला दिली.त्यानंतर ते संजय बारेलाच्या घरासमोर थांबले.त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता व मंत्रोच्चाराचा आवाज ऐकू येत होता.त्यानंतर दरवाजा उघडला असता २५ ते ३० स्री व पुरुष दिसून आले.तेंव्हा माझा आजार बरा होईल का? मला आर्थिक मदत मिळेल का? असे बोरसे याने विचारल्यावर कैलास बारेला याने ” तू हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्विकारल्यास सर्व सुविधा मिळतील.” असे आश्वासन दिले.त्यावेळी बोरसेच्या ओळखीचे नगरसेवक नितेश चौधरी घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button