अपघातजळगावमहाराष्ट्र
मासेमारी साठी गेलेल्या इसमाचा धरणात बुडून मृत्यू

अमळनेर ( विशेष प्रतिनिधी ) :-तालुक्यातील निसर्डी धरणावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका 55 वर्षीय इसमाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 4 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
नामदेव दामू भिल,वय 55 रा. खडके असे मयताचे नाव असून दिनांक 3 रोजी तो सायंकाळी धरणावर माश्यांचे जाळे टाकण्यासाठी गेला होता.दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत घरी न आल्याने भावाने शोधाशोध केली.त्यांनी धरणावर सर्व बाजूने पाहिले असता काठावर कपडे व चपला आढळून आल्या व नामदेव यांचे शव पाण्यात पालथे तरंगताना व हात पाय जाळ्यात अडकलेले आढळून आले.पोलीस पाटील जयदीप पाटील यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.तर मयताचा भाऊ संजय भिल याने अमळनेर पोलिसात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





