अपघातजळगावमहाराष्ट्र

ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून पडल्याने चालकाचा मृत्यू.


प्रतिनिधी – भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने त्यावरील तरुण चालकाचा पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १३) सायंकाळी सातच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बैठक हॉल येथे घडली. संदीप गोपाल मराठे (वय ३२, रा. भालगाव, ता. एरंडोल) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
दरम्यान याबद्दल मिळालेली माहिती अशी की भालगाव येथील रहिवासी संदीप मराठे गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रॅक्टरने (क्रमांक एम. एच.१९ डीव्ही ९७१६) घरी जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल पांडवजवळ असलेल्या बैठक हॉलसमोरच संदीप यांचे त्यांच्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ते खाली फेकले गेल्याने त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील व्यावसायिकांनी व नागरिकांनी त्यास ट्रॅक्टर खालून काढून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. अपघातात मृत झालेल्या संदीपचा 8 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. संदीप ट्रॅक्टर चालवून व शेतीचे कामे करून परिवाराचा चरितार्थ चालवीत होता. त्याच्या मागे पत्नी, आईवडील व लहान भाऊ असा परिवार आहे. याबाबत गणेश गोपाल मराठे यांनी एरंडोल पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक पाटील, अमोल भोसले तपास करीत आहेत. दरम्यान, अपघातात मृत पावलेल्या संदीप मराठे यांच्या पार्थिवावर भालगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.संदीपच्या अपघाती मृत्यूने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button