एरंडोलच्या गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या खेळांडुची राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी एरंडोल – काल दि.05/10/2026 रोजी येवला येथे नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत रा.ती. काबरे विद्यालय ज्युनिअर कॉलेज यांच्या माध्यमातुन गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेचे खेळाडु यामिनी भानुदास आरखे 53 किलो वजन गटात 19 वर्ष आतील शालेय कुस्ती स्पर्धेत तिने यश संपादन केले. दि.10/10/2026 रोजी होणार्या अलिबाग जि. रायगड या ठिकाणी राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी होणार्या कुस्तीस्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत त्यांना मार्गदर्शन गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष भानुदास आरखे कुस्तीकोच, वस्ताद दिलीप सोनवणे मार्गदर्शन लाभले. त्याचे अभिनंदन अनुजाती जन जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष अॅड किशोर भाऊ काळकर, आमदार अॅड. अमोल दादा पाटील, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरे बालाजी उद्योग समुहाचे संचालक, संजय काबरा, एम. डी. केमीकल्सचे पंकज काबरा प्रा. मनोज भाऊ पहेलवान, जि. युवा सेना अध्यक्ष व नगरसेवक, गटनेता एरंडोल न.पा., सुनिल देशमुख जि. सचिव जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघ, रा.ति. काबरे विद्यालयातील मुख्याध्यापक राठी सर यांचेसह गुरू हनुमान कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पंकज पाटील, सचिव अनिल मराठे, कार्यध्यक्ष दुर्गादास भाऊ वानखेडे, खजिनदार ऋषिकेश भाऊ महाजन, सर्व संचालक अनिल आरखे, अनिल भोई, संजय दादा कुंभार, दिलीप पाटील फौजी, जावेदभाऊ खाटीक, नगराज पवार, पिंन्टु भाऊ पाटील, अॅड. दिपक पाटील, संभाजी दादा देसले, राजु भाऊ साळी, तात्या ठाकुर, नरेंद्र दादा निकम, भरत दादा पाटील, स्वप्नील बोरसे सर आदींनी अभिनंदन केेले आहे.





