बांधकाम कामगार ते जनतेचा नगरसेवक…! गणेश मराठे …

प्रतिनिधी – एरंडोल : नगरपालिका स्वतंत्र निवडणूक २०२५ यावर्षी प्रभाग क्र. ९ मध्ये नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी अर्ज दाखल करून बांधकाम कामगार ते नगरसेवक अशी वाटचाल करणारे गणेश चिंधा मराठे पुन्हा एकदा जनसेवेच्या रणांगणात उतरले आहेत. मी जनतेच्या सुख-दुःखाची जाणीव ठेवणारा, विश्वासाला तडा न जाऊ देणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
गणेश मराठे हे अवघ्या १२ वर्षांच्या वयापासून शिवसेनेशी सक्रियपणे जोडले गेले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव मनात जपून त्यांनी सतत जनतेच्या प्रश्नांवर काम केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून प्रभाग ९ मधून त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच एरंडोल शहरातील सर्व बांधकाम कामगारांनी गणेश भाऊ यांना सामाजिक व आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.
जनतेसाठी सदैव पुढे
स्थानिक शिवसेना कार्यकर्ता म्हणून मराठे यांनी कोणतेही पद असो वा नसो, लोकांसाठी धावून जाण्याची भूमिका कायम ठेवली.
बांधकाम कामगारांच्या समस्या सोडवताना त्यांनी कधीही पाऊल मागे घेतले नाही.
प्रभागातील तसेच प्रभागाबाहेरील प्रश्नांवरही त्यांनी तेवढ्याच तत्परतेने लक्ष केंद्रित केले.
२०११ मध्ये प्रभागातील जनतेने त्यांना नगरसेवक पदाची संधी दिली आणि त्यांनी कामगिरीचा ठसा उमटविला.
पदाधिकारी नसतानाही सामाजिक कार्य न थांबवता त्यांनी स्वतःच्या खर्चाने कासोदा फाटा ते नगरपालिका उद्यान या मार्गावरील खराब रस्त्यावर मुरूम टाकून तो पसरवण्याचे कार्य केले. स्वतः हातात फावडा घेऊन केलेले हे काम आजही चर्चेत आहे.
“मी सामान्य आहे; जनतेसाठी कामच माझं बळ” – मराठे
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मराठे म्हणाले,
“नगरसेवक पदाचा कधीही गर्व केला नाही. मी आजही एक सामान्य माणूस आहे. रस्ते, गटार, पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांसाठी संपूर्ण शहरात २ ते ३ दिवसांत योग्य पुरवठा मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे.”
प्रभाग ९ मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे संचार झाले असून, साधेपणा, कष्टाळूपणा आणि सातत्यपूर्ण जनसेवा या गुणांमुळे मराठे यांच्या उमेदवारीमुळे जनतेचे विशेष लक्ष लागले आहे




