जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोल नगरपरिषद निवडणूक २०२५ : ईव्हीएम मशीनचे FLC प्रक्रिया पार

एरंडोल – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता इनडोअर हॉल, जलतरण तलाव, म्हसावद रोड, एरंडोल येथे ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणी (FLC) करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पाटील तसेच मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडली.
ईव्हीएम मशीनची कार्यक्षम तपासणी, सीलिंग व तांत्रिक पडताळणी करताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. या वेळी विविध राजकीय पक्षांचे उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच अपक्ष उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवत होते.
निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे आगामी मतदानासाठीची तयारी अधिक वेगाने सुरू झाली आहे. प्रशासनाकडून निवडणुका निर्विघ्न आणि पारदर्शक पार पडण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button