जळगावमहाराष्ट्रराजकारण

एरंडोल नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड

प्रतिनिधी एरंडोल – नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपनगराध्यक्ष तसेच दोन स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
सदर सर्वसाधारण सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर कामकाज पाहणार आहेत. याबाबतची माहिती मुख्याधिकारी अमोल बागुल व प्रशासकीय अधिकारी हितेश जोगी यांनी दिली.
दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेच्या सौ. सुनिता रूपेश माळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. तसेच स्वीकृत सदस्य पदासाठी शिंदे शिवसेनेकडून डॉ. नरेंद्र पाटील, तर भाजपाकडून योगेश देवरे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
एरंडोल नगरपालिकेत सध्या भाजपा व शिंदे शिवसेना युतीचे वर्चस्व असून, निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या २३ आहे. याशिवाय कायद्यानुसार दोन स्वीकृत सदस्यांची निवड या सभेत केली जाणार आहे.
पहिल्याच सर्वसाधारण सभेत महत्त्वाच्या पदांवरील निवडी होणार असल्याने या बैठकीकडे नगरसेवकांसह शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button