जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांची नचिकेत इमिजिंग सेंटरला शैक्षणिक भेट..

प्रतिनिधी एरंडोल : यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती के.डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल येथील इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी नचिकेत इमिजिंग सेंटर येथे शैक्षणिक भेट दिली.
यावेळी सेंटरच्या संचालिका डॉ. गीतांजली ठाकूर (MBBS, DMRD) यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून इमिजिंग सेंटरमध्ये करण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय तपासण्यांविषयी सविस्तर माहिती दिली. आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञान, एक्स-रे व इतर निदान प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयीही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी डॉ. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देत नियमित व्यायाम, संतुलित आहार व सकारात्मक विचार यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. तसेच धार्मिक व नैतिक मूल्यांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य  दीनानाथ पाटील सर व विषय शिक्षिका सौ. स्वाती पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. चि. अर्णव पाटील याने डॉ. गीतांजली ठाकूर यांची ओळख करून दिली, तर ध्रुव पाटील याने आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना ‘सार्थ हरिपाठ’ तसेच शाळेच्या वाचनालयासाठी प्राचार्यांना मराठी व इंग्रजी भाषेतील ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक ज्ञानाबरोबरच प्रेरणादायी अनुभव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button