जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोल महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन व आयुर्वेदिक वनस्पती कार्यशाळा

एरंडोल : येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे नवरोजी गोदरेज वनस्पती संशोधन केंद्र व महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ फेब्रुवारी रोजी विद्यापीठस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन व आयुर्वेदिक वनस्पती संकलन कार्यशाळा उत्साहात पार पडली.
विद्यार्थ्यांमध्ये वनस्पती संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात डॉ. क्रांती यार्दी यांनी पोस्टर सादरीकरण व वनस्पती संकलनाबाबत मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांच्या पोस्टर्सचे परीक्षण करण्यात आले.
स्पर्धेत F.Y.B.Sc. व S.Y.B.Sc. वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विजेत्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button