एरंडोल येथे चार वर्षीय बालिकेवर मामे आजोबा ने केला अत्याचार,

संतप्त जमावाचे रास्तारोको आंदोलन.
प्रतिनिधी – एरंडोल येथील लांडापूर भागातील चार वर्षीय बालिकेवर तिच्याच नातेवाईक असलेल्या ५९ वर्षीय मामे आजोबाने अत्याचार केल्यामुळे संतप्त झालेल्या महिला
व पुरुषांनी संशयितास आमचे ताब्यात द्या,संशयितविरोधात कडक कारवाई करा या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते.अदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांचेसह एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, पारोळ्याचे निरीक्षक अशोक पवार,धरणगावचे निरीक्षक सुनील पवार,कासोद्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत
पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढून संशयितास अटक करण्यात आली असून त्याचे विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आईच्या चुलत मामाने नात्याने नात असलेल्या चार वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्यामुळे नराधमाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्यामुळे परिसरात
तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी,की शहरातील लांडापूर भागात राहणारी चार वर्षीय बालिका दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपल्या घरात आई व भावंडासह खेळत होती.बालिकेची आई प्रात:विधीसाठी गेल्यानंतर पंधरा मिनिटांनी घरी आली
असता त्यांना चार वर्षीय बालिका घरात आढळून न आल्याने तिने मुलांसह आजूबाजूला चौकशी केली.घराशेजारीच राहणारे बालिकेचे नात्याने मामेआजोबा असलेल्या नातेवाईकाकडे बालिकेची आई चौकशीसाठी गेली असता त्यांना घराचा दरवाजा अर्धवट स्थितीत लावलेला दिसून आला.बालिकेच्या आईने त्यांचेकडे तिची चौकशी केली असता त्याने मला माहित नसल्याचे सांगितले.बालिकेच्या
आईला मामा अर्धवट नग्नावस्थेत दिसून आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्याच्या पोटाखाली लहान मुलीचे पाय दिसून आले त्यावेळी त्याना त्यांची चार वर्षीय बालिका आढळून आली.आईने बालिकेला घेवून घरी आणले . बालिकेच्या आईने घडलेल्या घटनेची माहिती पती यांना दिली.
याबाबत बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयित नराधमाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली असून
सहाय्यक निरीक्षक शंकर पवार तपास करीत आहेत.दरम्यान चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना समजताच संशयीताविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, संशयितास आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत शेकडो महिला व पुरुषांनी पोलीस स्थानक परिसरात गर्दी केली.तसेच राष्ट्रीय महामार्गावरील कासोदा फाट्याजवळ रास्तारोको आंदोलन सुरु केले.उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते,पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचेसह हवालदार अनिल पाटील,आकाश शिंपी,पोपट सोनार,सचिन पाटील,दीपक पाटील यांचेसह पोलीस
कर्मचा-यांनी आंदोलनस्थळी धाव घेवून संतप्त जमावाची समजूत काढून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली.बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या व पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



