जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसांस्कृतिक

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात शिक्षणासोबत मनोरंजनाचा अभिनव उपक्रम….

युफोरिया 2026’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

एरंडोल :  शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘युफोरिया 2026’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दि. 14 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, कलात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण महाविद्यालय परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री होते. यावेळी सचिव सौ. रूपा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. जावेद शेख तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. राहुल बोरसे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश पाटील, प्रतीक्षा पाटील, प्रियंका सोनवणे व प्रज्ञा पाटील यांनीही सूत्रसंचालनात सहभाग घेत कार्यक्रम अधिक रंगतदार केला.

या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पारंपरिक व आधुनिक नृत्य, समूह नृत्य, गायन, नाटिका, फॅशन शो आदी विविध कार्यक्रम सादर केले. रंगीबेरंगी वेशभूषा, आकर्षक संगीत आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमादरम्यान नृत्य, गायन, अभिनय व फॅशन शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार पदवी विभागातून मुलींमधून नाजनीन सय्यद हिला, तर मुलांमधून तुषार साळुंखे याला प्रदान करण्यात आला. तसेच पदविका विभागातून आरती पाटील व महेंद्र पाटील यांना हा सन्मान देण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो.

प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. गायत्री सूर्यवंशी, प्रा. योगेश्वरी लोहार, प्रा. मयुरी पाटील, प्रा. श्रद्धा शिवदे, प्रा. सुमेश पाटील, प्रा. मंगेश पाटील, प्रा. करण पावरा, प्रा. अनिता वळवी, प्रा. चंद्रभान पाटील, प्रशांत निळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जावेद शेख यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळे ‘युफोरिया 2K26’ स्नेहसंमेलन यशस्वीरीत्या पार पडले.

या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पूर्वी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा Alumni Meet आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 16 माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवून सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button