जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोल तालुक्यात जनगणना २०२७ साठी प्रशिक्षणाला सुरुवात..

प्रतिनिधी एरंडोल :-  आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर एरंडोल तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र उत्साहात सुरू झाले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक २४  एप्रिल २०२६ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

तालुक्यातील प्रशिक्षणाची सोय दोन ठिकाणी करण्यात आली असून पंचायत समिती हॉल तसेच डी.डी.एस.पी. महाविद्यालय, एरंडोल येथे स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी ५० -५० कर्मचारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००  या वेळेत प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले.

एरंडोल तहसीलदार गोपाळ पाटील यांनी दोन्ही प्रशिक्षण केंद्रांना भेट देत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. डी डी एस पी महाविद्यालय प्रशिक्षण स्थळी नायब तहसीलदार अमोल बंन तर पंचायत समिती सभागृह प्रशिक्षण स्थळी नायब तहसीलदार विवेक वैराळे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देणाऱ्या ट्रेनर्सना आवश्यक सूचना देऊन संपूर्ण प्रक्रियेची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करत अचूक व पारदर्शक माहिती संकलन करण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षणादरम्यान सहभागी कर्मचाऱ्यांसाठी सकाळी व सायंकाळी चहाची तसेच दुपारच्या जेवणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. प्रशिक्षण सत्राला सर्व संबंधित कर्मचारी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जनगणना प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button