अपघातजळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोलजवळ भरधाव एसटीचा भीषण अपघात; १८ प्रवासी जखमी, चालकाला पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत.

प्रतिनिधी एरंडोल :-एरंडोल पासून काही अंतरावर भालगाव फाटा नजीक आज सकाळी धुळेहून भुसावळकडे जाणाऱ्या एसटी बस एम.एच २० बिएल ३४१२  बसचा  भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या डिव्हायडरला जोरात धडकली. या अपघातात एकूण १८ प्रवासी जखमी झाले असून काही प्रवाशांना गंभीर स्वरूपाचे दुखापत आहे.
         अपघातग्रस्त बसमध्ये १५ प्रवासी, १ चालक, १ वाहक आणि राज्य परिवहन महामंडळाचा १ कर्मचारी असे एकूण १८ जण प्रवास करत होते. धडकेनंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
           या दुर्घटनेत चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसवरील नियंत्रण अचानक सुटल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे सुरू असलेले काम, डिव्हायडरची रचना, तसेच बस चालकांवर असलेला कामाचा ताण या सर्व बाबींचा सखोल विचार करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button