आरोग्यजळगावमहाराष्ट्र

ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त टाकरखेडा येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


एरंडोल – तालुक्यातील टाकरखेडा येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा एरंडोल-विखरण मंडळ व भूमिपुत्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपत अशा आरोग्य उपक्रमांची ग्रामीण भागात मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या शिबिरात जळगाव येथील आरएल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. विविध आजारांबाबत वैद्यकीय सल्ला, आवश्यक औषधोपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन मोफत देण्यात आले. विशेष म्हणजे शेकडो ज्येष्ठ नागरिकांनीही या शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष नानाभाऊ महाजन, माजी जि.प. सदस्य भिका भाऊ कोळी, डॉ. निखिल बाविस्कर, जयश्री पाटील, स्वप्निल पालवे, माजी सभापती मोहन भाऊ सोनवणे, सरपंच प्रवीण पाटील, किरण कोळी, उपसरपंच निलेश भोई, श्याम पाटील, निवृत्ती कोळी, अँड. परेश चौधरी, रमेश अण्णा महाजन, उमाजी सोनवणे, विलास पाटील, श्याम बोरसे, ज्ञानेश्वर धनगर, विनोद बिऱ्हाडे, विश्वास पाटील, राजू पाटील, मधुकर भराडी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिबिरातून नानाभाऊ महाजन यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेत जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच टाकरखेडा ग्रामस्थांच्या वतीने नानाभाऊ महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विक्की खोकरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button