जळगावमहाराष्ट्रराजकारण

एरंडोल नगरपरिषद पोटनिवडणुकीचा रंग चढला; प्रभाग ९ (ब) साठी ५ महिला उमेदवार रिंगणात

एरंडोल : एरंडोल नगरपरिषद पोटनिवडणूक २०२६ चा राजकीय माहोल आता चांगलाच तापू लागला असून प्रभाग क्रमांक ९ (ब) मधील महिला राखीव जागेसाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दि. १८ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत एकूण पाच महिला उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निर्धारित मुदतीत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

  1. रत्नाबाई राजेंद्र चौधरी
  2. गायत्री दीपक पाटील
  3. शेख शबानाबी कलीम
  4. सरलाबाई गणेश चौधरी
  5. देवयानी लीलाधर पाटील (भारतीय जनता पक्ष)

या पोटनिवडणुकीकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले असून विविध राजकीय पक्षांसह स्थानिक पातळीवरील गट-तट सक्रिय झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी वाढण्याची शक्यता असून मतदारांशी संपर्क साधण्यासाठी उमेदवारांकडून बैठका, भेटीगाठी व प्रचार फेऱ्यांना सुरुवात होणार आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यात अर्जांची छाननी, माघार आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. प्रभाग ९ (ब) मधील मतदारसंख्या आणि स्थानिक प्रश्न लक्षात घेता ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button