जळगावमहाराष्ट्र

शास्त्री फार्मसीचा डी. फार्मसी परीक्षेत पुन्हा शंभर टक्के निकाल

एरंडोल : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या उन्हाळी २०२६ डी. फार्मसी परीक्षेत शास्त्री फाऊंडेशन संचालित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल ने पुन्हा एकदा १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

प्रथम वर्ष डी. फार्मसीमध्ये कु. मोनाली मराठे हिने ७६.७०% गुणांसह प्रथम, मच्छिंद्र पाटील यांनी ७०.५०% गुणांसह द्वितीय, तर कु. ऋतिका चौधरी हिने ६९.८०% गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

अंतिम वर्ष डी. फार्मसीमध्ये कु. कांचन माळी हिने ७७.६४% गुणांसह प्रथम, महेंद्र पाटील यांनी ७७.३६% गुणांसह द्वितीय, तर जगदीश पाटील यांनी ७६.०९% गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.

संस्थेचा सलग १०० टक्के निकाल, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई कडून अति उत्तम मानांकन प्राप्त शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची ओळख बनली आहे. परिसरातील विद्यार्थिनी शासकीय (लाडकी बहीण योजनेचा) शिष्यवृत्तीचा पुरेपूर फायदा घेत मोफत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री आणि उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून संस्था यशाची परंपरा अधिक बळकट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button