जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोल येथे शांतता समितीची बैठक संपन्न.

एरंडोल – येथे नगर पालिका सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष देवीदास महाजन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते,लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकुर,उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी,शिवसेना गटनेता प्रा.मनोज पाटील,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दीन शेख कासम, शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन,नायब तहसीलदार संजय घुले,विद्युत कार्यकारी अभियंता गेडाम,नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक एस.आर.ठाकुर, माजी नगरसेवक विजय महाजन,जगदीश ठाकुर म्हणुन उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात देविदास महाजन यांनी गणेशोत्सव हा ताकदीचा उत्सव असुन युवकांनी ती योग्य ठिकाणी वापरावी व प्रशासनाने सी. सी. टी. व्हि. कॅमेरे बसवावे असे सांगितले.यावेळी शहरातील एकूण १८ गणेश मंडळाचे पदाधिकारी,शांतता समितीचे सदस्य व राजकीय,सामाजिक क्षेत्रातील सदस्य उपस्थित होते.बैठकीचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांनी केले.आभार पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी मानले.बैठकीचे सूत्रसंचलन संदिप महाजन यांनी केले.बैठक यशस्वीतेसाठी पोलिस उपनिरीक्षक संपत कण्हेरे,पोलिस हवालदार अनिल पाटील तथा नगर परिषदेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बैठकीस माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,मोहन चव्हाण,विशाल सोनार,परेश बिर्ला,जावेद मुजावर,ॲड.अहमद सैय्यद,ईश्वर बिऱ्हाडे,राजेंद्र महाजन,रविंद्र लाळगे, सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ पठाण,कमुरुद्दीन सैय्यद,अतुल महाजन,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,नगरसेवक नितेश चौधरी,नामदेव पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button