जळगावमहाराष्ट्र

शिक्षणप्रणालीत शिक्षक हा सर्वात महत्वाचा दुवा : प्रमोद पाटील चिलाणेकर

प्रतिनिधी एरंडोल : आडगांव येथे धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेत भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षकदिन मोठ्या उत्साहात पार पडला . १ ते ५ तासिका विद्यार्थी शिक्षकांनी घेऊन संपूर्ण नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीने शाळा चालवून दाखवली . प्रार्थना ते शाळा सुटे पर्यन्त वंदे मातरम त्यांनी शाळा यशस्वी रित्या चालवून दाखवली . विशेषतः सर्व विद्यार्थीनीनी शिक्षकांची भूमिका बजावली . विद्यार्थीनी मुख्याध्यापिका म्हणून कल्याणी मराठे व पर्यवेक्षिका विद्या महाजन यांनी भूमिका बजावली . कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर म्हणून उपस्थित होतें . कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यार्थी मुख्याध्यापिका कल्याणी मराठे होते . यावेळी पी जी कोळी , वाय व्ही पाटील , श्रीमती प्रतिभा कुमावत , ज्योती घुणे , आदि उपस्थित होते शिक्षक मनोगत अभिलाष महालपुरे , विनोद सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले . प्रमुख अतिथी मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जीवनात गुरुंचे सर्वात मोठे स्थान असून गुरुमुळे शिष्य सर्वश्रेष्ठ ठरत असतो शिक्षण प्रणालीत शिक्षकांची महत्वाची भूमिका असून शिक्षक हा शिक्षणाचा दुवा मानला जातो . गुरुंचे महत्व सर्व पृथ्वीतलावर सर्वात महत्वाचे व श्रेष्ठ मानले जाते . यावेळी दुसऱ्या सत्रात गोपाळकाला निमित्त दहिहंडी चा कार्यक्रम घेण्यात आला . विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर होते . कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख विनोद सपकाळे तर प्रतिभा कुमावत , ज्योती धुणे यांनी परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button