जळगावमहाराष्ट्र

भारतीय मजदूर संघा तर्फे तहसीलदार यांना दिले निवेदन…

प्रतिनिधी – भगवान श्री विश्वकर्मा जयंतीचा दिवस म्हणजेच १७ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघ, जळगाव जिल्हा शाखा एरंडोल तालुका वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन एरंडोल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संजय घुले साहेब यांना देण्यात आले.
देशभरात दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती देशभर श्रद्धा व उत्साहात साजरी केली जाते. भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे आद्य शिल्पकार तसेच श्रमिक, कारागीर व कौशल्याधारित कामगारांचे आराध्य दैवत मानले जातात. भारताच्या विकास व प्रगतीमध्ये श्रमिक, कारागीर, तंत्रज्ञ तसेच विविध कौशल्याधारित कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लोहार, सुतार, बांधकाम गवंडी, कुंभार, विणकाम कामगार हस्तकला कारागीर तसेच अनेक विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेला श्रमिक वर्ग १७ सप्टेंबर रोजी आपल्या कामातून वेळ काढून भगवान विश्वकर्मा जयंती श्रद्धेने साजरी करतो. भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून या दिवशी भगवान विश्वकर्मा पूजन, शोभायात्रा, श्रमिक वस्त्यांमध्ये सेवा उपक्रम, रक्तदान शिबिरे, विचारगोष्टी तसेच श्रमिक हिताशी संबंधित विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश मार्फत महाराष्ट्रातील विविध तालुक्यांमध्ये या मागणीसाठी निवेदने देण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने एरंडोल येथे मा.तहसीलदार साहेब मार्फत निवेदन सादर करून ते केंद्र सरकार पर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली.
१७ सप्टेंबर हा भगवान विश्वकर्मा जयंतीचा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करण्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हा सचिव तथा तालुका अध्यक्ष  अशोक मोरे, ज्येष्ठ नागरिक संघ.व्ही वाय पाटील.बांधकाम कामगार संघ अध्यक्ष  विज्ञान पाटील, दशरथ महाजन, रघुनाथ महाजन, कैलास भोई,व इतर कामगारांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button