एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ नरेंद्र ठाकूर यांचा महाराष्ट्र भुलवैद्यशास्त्रतज्ञ संघटनेकडून पांचगणी येथील राज्य परिषदेत विशेष सन्मान.
प्रतिनिधी एरंडोल – नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या उपस्थितीत “ Guest of Honour “ म्हणून राज्य भूलवैद्यशास्त्रतज्ञ परिषदेत विशेष सन्मानीत करण्यात आले.
पांचगणी, सातारा येथे संपन्न झालेल्या उदघाटन सोहळ्यात एरंडोल शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील भुलवैदयक शास्त्र तज्ञ डॉक्टरांसाठी आपल्या परिवारातील एक सदस्य वेगळी वाट निवडून राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल अभिमान वाटतो असे प्रतिपादन याप्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष वं परिषदेचे सचिव डॉ. अविनाश भोसले यांनी केले .
या प्रसंगी मनोगतात डॉ नरेंद्र ठाकूर यांनी एक भुलवैद्यक शास्त्र तज्ञ ते लोकनियुक्त नगराध्यक्ष हा संघर्षमय प्रवास व त्यामागील भूमिका व्यक्त केली. राजकारण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे हा उद्देश ठेऊन आजपर्यँत काम करत आलो असून राज्य परिषदेने केलेला हा सन्मान, या शुभेच्छा व सदिच्छा पुढील आयुष्यासाठी मैलाचा दगड ठरेल असे मत व्यक्त करून सर्व संयोजन टीम वं राज्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, डॉ.माधुरी लिमये,महाराष्ट्र भूलवैद्यक तज्ञ संघटना डॉ.अविनाश भोसले व भुलवैद्यक तज्ञ संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.




