जळगावमहाराष्ट्र

निसर्गसखी मंगला रोकडे यांना साहित्यरत्न पुरस्कार जाहिर


प्रतिनिधी – येथिल कवियित्री निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे यांना  साहित्यरत्न पुरस्कार २०२६ नुकताच जाहिर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना बोलीभाषा साहित्य संस्था अकोला द्वारा जाहिर करण्यात आला असून सर्व बोली भाषा मधून अहिराणी ह्या खान्देशी बोली भाषेसाठी  मंगलाताईंची ह्या पुरस्कार साठी निवड करण्यात आली असल्याचे सदर संस्था चालकांनी निवड पत्रकाद्वारे कळविले आहे.
मंगलाताई रोकडे यांना हा पुरस्कार दि. २२ नोहेंबर २०२६ रोजी अमरावती येथे बोलीभाषा साहित्य संमेलन प्रसंगी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.  मंगलाताईंना हा सन्मान त्यांच्या खान्देशी बोलीभाषा अहिराणी वर असलेल्या प्रभुत्वा साठी देण्यात येत आहे. त्यांनी धुळे आणि जळगांव मधून अहिराणी बोलीभाषेतून १९९९ पासून विपुल लेखन केले आहे. आणि आजही त्यांचे लेखन अव्याहत चालू आहे.
सदर पुरस्कार संदर्भात त्यांचे धुळे जळगांव नाशिकसह खान्देशमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button