जळगावमहाराष्ट्रशेती विषयक

गांधीपुरा विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत लाभांशाचे वाटप, सभासद शेतकऱ्यांना आनंद .

प्रतिनिधी एरंडोल – एरंडोल शहरातील गांधीपुरा भागातील गांधीपुरा विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत  2024 ते 2025 या आर्थिक वर्षात मिळवलेल्या नफ्यातून दहा टक्के लाभांश वाटप करण्याचे संचालक मंडळाकडून निश्चित करण्यात आले.
सुमारे दहा वर्षांपूर्वी या संस्थेमार्फत लाभांश वाटप करण्यात आला होता असा सभासदांमधून बोलले जात होते.  मागील वर्षी संस्थेने उत्कृष्ट कार्य करून योग्य पद्धतीने वसुलीवर भर दिला व संस्थेला आर्थिक वर्षात नफा मिळवून दिला त्याबद्दल त्या कर्मचाऱ्यांचे देखील संचालकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
सदर साचलेला  नफा वाटप करून दुष्काळी परिस्थितीत सभासद शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत म्हणून लाभांश वाटप करण्याचे सर्व संचालक व चेअरमन यांनी सर्वानुमते ठरवले व शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण केले .सदर लाभांश वाटप दिनांक 2/11/2026 रोजी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे चेअरमन व संचालकांच्या उपस्थिती त शेतकरी सभासदांना वाटप करण्यात आले दहा वर्षापूर्वी मिळालेला लाभांश व आता मिळालेला लाभांश यातला आनंद शेतकरी वर्गाला जाणवत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button