एरंडोल तालुका समायोजन बदली प्रक्रियेत शिक्षक दांपत्यावर अन्याय झाल्याप्रकरणी शिक्षकाचे पंचायत समिती कार्यालयासमोर दोन दिवसाचे लाक्षणिक उपोषण……….!

प्रतिनिधी एरंडोल – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र हिलाल चित्ते व त्यांच्या धर्मपत्नी सुनंदा ब्रिजलाल भामरे ( उपशिक्षिका ) हे दोघे एकाच शाळेत कार्यरत असून ऑनलाईन पोर्टल बदली २०२५ – २६ मध्ये झालेल्या वन युनिट मधून संवर्ग ४ मध्ये बदलीने संबंधित शाळेत रूजू झाले आहेत.तरी देखील त्यांच्या समायोजन बदली प्रक्रियेमध्ये यादीत नाव जोडले जात आहे.त्यामुळे त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात १० एप्रिल व ११ एप्रिल २०२६ असे सलग दोन दिवस एरंडोल पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
राजेंद्र चित्ते यांनी तालुक्यातील समायोजन प्रक्रीयेवर आक्षेप घेतला असून याप्रकरणी सविस्तर चौकशी होऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.दरम्यान स्वतःच्या अधिकाराबाबत सदर शिक्षकाने जागृकता दाखविल्याचे यावरून स्पष्ट होते.
गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची चित्ते यांना विनंती केली.परंतु ” आपल्याला पुर्ण न्याय मिळाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही.” अशी ठाम भूमिका राजेंद्र चित्ते यांनी घेतली आहे.





