जळगावमहाराष्ट्र

एरंडोल संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार .अमोल बन यांच्यावर त्वरित शिस्तभंग कायद्यानुसार कारवाई करावी

रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तहसीलदार यांना निवेदन सादर…..,.
एरंडोल – येथील   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने तहसीलदार  यांना निवेदन सादर करण्यात आले
    निवेदनात  नायब तहसीलदार अमोल बन, शासन निर्णयांचे उल्लंघन करून एरंडोल तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत   लाभार्थ्यां कडून शासन निर्णय नुसार दिनांक २०/८/२०२१९ रोजीच्या शासन निर्णय विशेष सहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे. सदर योजनेतील ५० वर्षावरील लाभार्थ्यांच्या अडी अडचणी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
       संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील ५० वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाच्या दाखला दरवर्षी न घेता तो ५ वर्षातून एकदा घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. असे शासन परिपत्रकात  स्पष्ट नमूद आहे.
       परंतु एरंडोल संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अमोल बन वरील शासन निर्णयाचे उल्लंघन करीत आहेत .
   लाभार्थ्यांकडून वयोगटा बाबत चौकशी न करता मनमानी पद्धतीने  गोर गरीब लाभार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांच्या कार्यालयात बोलवून घेत चुकीची माहिती देत  आहेत.
      तसेच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लाभार्थी तलाठी कार्यालयात जात असतात एकीकडे जनगणनेचे  युद्ध पातळीवर काम सुरू आहे. तलाठी कार्यालयात भेटत नसतात. उत्पन्न दाखल्यामुळे लाभार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास होत आहे.
        यावर्षी तालुक्यात ४५ उंच सेल्सिअस तापमान असताना वयोवृद्ध उन्हाचा त्रास होत आहे. वरील परिस्थितीची भान बन यांना दिसत नाही का….? असा सवाल तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
   
        सेतू सुविधा केंद्र यांच्यासाठी आर्थिक हित जोपासत दिसून येत आहे. प्रति उत्पन्न दाखल्यांसाठी शासनाने ६९ रुपये असून सेतू केंद्र चालक मालक  गोरगरीब लोकांकडून २०० रुपये घेत आहेत. तसेच डोमेसाईल ची फि ६९ रु आहे तरी ३०० रु. व नॅशनॅलिटी३००रू या प्रमाणे फी घेतली जात आहे.
       तरी महोदय वरील विषयी आपल्या स्तरावरून चौकशी करून  बन यांच्यावर त्वरित शिस्तभंग कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच उत्पन्न दाखल्यांची अट शिथिल करावी.
     अन्यथा उपरोक्त संघटनेकडून बन  यांचे  आपल्या तहसील कार्यालय आवारात प्रतिमा दहन करण्यात येईल. यांची नोंद घ्यावी. सदर निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर, गजानन पाटील, भाऊसाहेब पानपाटील, महीला आघाडी एरंडोल तालुकाध्यक्ष मायाताई खैरनार, जितेंद्र वाघ, मनोज सोनवणे,अजय बिऱ्हाडॆ, राहुल पानपाटील , रविंद्र साबळे, सुभाष पाटील, यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button