शास्त्री फार्मसी इन्स्टिट्यूट मध्ये “Rx for Success” ने विद्यार्थ्यांना दिली यशाची नवी दिशा

एरंडोल | प्रतिनिधी – विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारी “Rx for Success” ही प्रेरणादायी कार्यशाळा दिनांक २२ एप्रिल रोजी शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत Statcode Solutions LLP, पुणे येथील संचालक व संस्थेचे माजी विद्यार्थी सौरभ पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री व संस्थापक सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या प्रेरणेने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
👉 करिअर प्लॅनिंग ते इंडस्ट्री संधी — सविस्तर मार्गदर्शन
सौरभ पाटील यांनी करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास, उद्योगक्षेत्रातील वाढत्या संधी, आवश्यक कौशल्ये तसेच फार्मसीमध्ये सांख्यिकीचा प्रभावी वापर यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
👉 संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यशाळेत आयोजित प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत आपल्या शंका दूर केल्या. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना करिअरबाबत स्पष्ट दिशा मिळाली.
👉 प्राध्यापकांचे प्रेरणादायी संदेश
प्रा. जावेद शेख व प्रा. राहुल बोरसे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत अशा कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी मानले. सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.





