मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या आदर्श माता गंगाबाई पवार यांचा ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे गौरव

एरंडोल… आपल्या मुलांना डॉक्टर घडविणाऱ्या श्रीमती गंगाबाई शिवाजी पवार यांचा नुकताच जागतिक मातृदिन सप्ताह निमित्त विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आईबाप जागराचे प्रणेते तथा वक्ते प्रवीण महाजन हे होते. यावेळी श्रीमती गंगाबाई शिवाजी पवार यांचा ऊर्जा सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षा अंजली प्रवीण महाजन यांच्या हस्ते शाल बुके देऊन सन्मान करण्यात आला. स्व. डॉ. एस ओ पवार यांच्या निधनानंतर गंगाबाई शिवाजी पवार या कुटुंबासाठी आईबरोबरच बापाची ही भूमिका समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांचे थोरले सुपुत्र डॉ. संभाजी शिवाजी पवार ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे होमिओपॅथिक तज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांचे दुसरे कनिष्ठ सुपुत्र डॉ.परेश शिवाजी पवार हे अमळनेर येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. होमिओपॅथिक तज्ञ म्हणून दोघेही बंधूंचा जळगाव जिल्ह्यात व ठाणे जिल्ह्यात विशेष नावलौकिक आहे. यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रसिद्ध वक्ते प्रवीण महाजन यांनी सांगितले की, प्रत्येक कुटुंबासाठी आई हा श्रद्धेचा प्रेरणेचा भक्तीचा सुरेख संगम असून तिचा संघर्ष व कष्ट माणूस आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. तिच्यामुळेच माणसाला स्वतःबरोबरच जगाची ओळख होते. तिचं अस्तित्व नेतृत्व व कर्तृत्व सदैव कुटुंबाला जोडून ठेवते. अशा प्रेम व शक्ती कुटुंबाला बहाल करणाऱ्या आदर्श मातांचा सन्मान करणे ही काळाची गरज असून पुढच्या पिढीमध्ये आई-वडिलांविषयी ममत्व, प्रेम भावना रुजावी यासाठी आदर्श आईंचा गौरव होणं ही समाजाच्या दृष्टीने प्रेरणा देणारी गोष्ट आहे. यावेळी कु. स्वरा महाजन,कु. तेजस्विनी महाजन या देखील उपस्थित होत्या.
.




