जळगावमहाराष्ट्र

अंजनी धरणातून  पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन…….!

मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ ; अंजनी नदीला पूर म्हसावद कडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बंद

एरंडोल– : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर  अंजनी धरणातून  पाण्याचा  विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

  नदीकाठावरील नागरिकांनी आपल्या गुरेढोरे, पशुधन, शेतीमधील मोटारपंप, कृषी अवजारे व इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची तीव्रता आणि पाण्याची आवक लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button