जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

एरंडोल महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाची ‘अंजनी बेकरी’ला औद्योगिक भेट, विद्यार्थ्यांना मिळाले व्यवसायाचे प्रत्यक्ष धडे.

एरंडोल – दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांना उद्योग व व्यवसायाचे प्रत्यक्ष धडे मिळावेत आणि त्यांच्यात उद्योजकतेविषयी जाणीव-जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने एरंडोल येथील ‘अंजनी बेकरी’च्या औद्योगिक भेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शैक्षणिक भेटीमध्ये अर्थशास्त्र विभागातील ४० विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
बेकरीला भेट दिल्यानंतर निलेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना बेकरी उत्पादनांची आणि व्यवसायाच्या स्वरूपाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी बेकरीच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडत, या बेकरीमार्फत ३५ प्रकारचे उत्पादन तयार केले जात असल्याचे सांगितले. तसेच उत्पादने एरंडोल, धरणगाव, चोपडा, अमळनेर आणि शिरपूर तालुक्यांत कशी वितरित केली जातात, स्वच्छतेसाठी घेतली जाणारी काळजी आणि या व्यवसायामुळे निर्माण झालेला रोजगार यावर सखोल प्रकाश टाकला.
यावेळी प्रमिला भोसले,रत्ना भोसले आणि शितल भोसले यांनी आरोग्याला अपाय न होऊ देता दर्जेदार बेकरी प्रॉडक्ट्स कसे तयार केले जातात, याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मालक व प्रतिनिधींनी समर्पक उत्तरे दिली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील व उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर यांचे मार्गदर्शन लाभले, तर संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले. भेट यशस्वी करण्यासाठी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. एस. वानखेडे आणि प्रा. विजय गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button