जळगावताज्या बातम्याधार्मिकमहाराष्ट्र

एरंडोल येथे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

एरंडोल-शहरासह ग्रामीण भागात हजारो भाविकांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.पहाटे पाच वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन
करण्यात आले.विसर्जन मिरवणुकीवर गुलालासह विविध कागदी पाकळ्यांचा वर्षाव करून भाविकांनी गणपतीचे स्वागत केले.
शहरात सकाळपासूनच लहान मंडळांनी मिरवणूक काढून विधिवत पूजा करून गणपतींचे विसर्जन केले.सकाळी पांडववाडा मित्र मंडळ,मरीमाता चौक मित्र गणेश मंडळ या
प्रमुख मंडळांनी गणपतीचे विसर्जन केले.दुपारी चार वाजता शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला जयगुरू व्यायाम शाळेचा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी होता.चौक गणेश मंडळ,श्री सावता माळी व्यायाम शाळा,बालवीर गणेश मंडळ,बालमित्र गणेश मंडळ,नम्रता गणेश मंडळ,माहेश्वरी नवयुवक गणेश मंडळ,अखिल ब्रह्मवृंद युवक मंडळ,ज्ञानदीप मित्र मंडळ,सर्वोदय मित्र मंडळ,बालाजी मित्र मंडळ,छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ,संताजी मित्र मंडळ,जयहिंद व्यायाम शाळा,जय बजरंग मित्र मंडळ,हरीपुरी युवक गणेश मंडळ,नागराज मित्र मंडळ असे सतरा प्रमुख सार्वजनिक
गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.   मिरवणुकीत शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक सहभागी झाले होते यामध्ये महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळत होते.नम्रता गणेश मंडळातील अदिवासी युवकांचे नृत्य मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध राष्ट्रीय पुरुषांचे छायाचित्र असलेले फलक तसेच विविध घोषणा लिहिलेले फलक,भगवे ध्वज घेवून मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गुलालाचा कमी प्रमाणात वापर करून विविध रंगांच्या कागदी व चमकीच्या पाकळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला.नागोबा मढी येथे श्री.सावता माळी गणेश मंडळाचा गणपती आल्यावर नागराज गणेश मंडळातर्फे दोघ गणपती मूर्तीचे स्वागत अनोखे व डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे होते.याप्रसंगी हजारो भाविक सदर प्रसंग बघण्यासाठी एकत्र आले होते.अशाच पद्धतीने गांधीपुरा भागातील जयहिंद चौकात देखील गणपतीचे आकर्षक रोषणाई ने स्वागत करण्यात आले.त्यानंतर होळी मैदान येथे देखील जयहिंद गणेश मंडळ च्या गणपतीचे छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळातर्फे स्वागत करण्यात आले.
मिरवणूक काळात वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच कोणतीही दुर्घटना होणार नाही याबाबत वीज वितरण
कंपनीच्यावतीने दक्षता घेण्यात आली होती.प्रमुख ठिकाणी भाविक आणि विविध सामाजिक,राजकीय पक्षांच्या वतीने पदाधिका-यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.नगरपालिका कार्यालयाजवळ पालिकेच्या वतीने गणेश मंडळांचे अध्यक्षांचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाल पाटील,पोलीस निरीक्षक सुनील पवार, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,किशोर निंबाळकर,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी यांचेहस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले तसेच गणपतींच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करण्यात आला.  नगरपालिकेतर्फे ठिकठीकाणी मूर्ती व निर्माल्य संकलित करण्यात आले.बाखरूम बाबा मशिद जवळ पत्रकार जावेद मुजावर व माजी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दीन शेख कासम यांनी गुलाब पुष्प देऊन गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व गणपतीचे स्वागत केले.विसर्जन मिरवणुकीतील सुमारे वीस ते पंचवीस फूट उंचीच्या गणपतीच्या मूर्ती नेतांना मंडळांच्या पदाधिका-यांना मोठी कसरत करावी लागली.अप्पर
पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचेसह पोलीस कर्मचारी,गृहरक्षक दलाचे जवान,महसूल कर्मचारी,पालिका कर्मचारी,शांतता समिती सदस्य,विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.किरकोळ वादविवाद वगळता मिरवणूक शांततेत पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button