ताज्या बातम्या

गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या दोन खेळांडुची नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

एरंडोल – येथील गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेचे खेळाडूंची
दि.२४/०९/२०२६ रोजी चाळीसगाव या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल चाळीसगाव येथे झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत डी.डी.एस.पी. कला, वणिज्य व विज्ञान महाविद्यालय ज्युनिअर कॉलेज एरंडोल व रा.ती. काबरे विद्यालय ज्युनिअर कॉलेज चे खेळाडु यामिनी भानुदास आरखे ५३ किलो वजन गटात तर ७६ किलो वजनगटात चेतन दिलीप सोनवणे १९ वर्ष आतील शालेय कुस्ती स्पर्धेत याने यश संपादन केले व दि.३०/०९/२०२६ रोजी होणाऱ्या भगुर जि. नाशिक या ठिकाणी नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी होणाऱ्या कुस्तीस्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी त्यांना गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष भानुदास आरखे कुस्तीकोच, वस्ताद अनिल मराठे, वस्ताद दिलीप मराठे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच त्यांचे अनुजाती जन जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष ॲड.किशोर काळकर,आमदार ॲड .अमोल पाटील,डी.डी.एस.पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरे बालाजी उद्योग समुहाचे संचालक संजय काबरा, एम.डी. केमीकल्सचे मालक पंकज काबरा,शिवसेना गटनेता प्रा. मनोज पाटील,जिल्हा सचिव जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघ सुनिल देशमुख यांनी अभिंनदन केले आहे. गुरू हनुमनामन कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पंकज पाटील, कार्यध्यक्ष दुर्गादास वानखेडे, खजिनदार ऋषिकेश महाजन,संचालक अनिल आरखे, अनिल भोई, संजय कुंभार, दिलीप पाटील, जावेद खाटीक, नगराज पवार, पिंन्टु पाटील,ॲड. दिपक पाटील, संभाजी देसले राजु साळी, तात्या ठाकुर, नरेंद्र निकम,भरत पाटील, स्वप्नील बोरसे, सर्व सभासन यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button