एरंडोल महाविद्यालयात मतदान नाव नोंदणी अभियान संपन्न.

एरंडोल – येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालय व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान नाव न नोंदणी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना नविन नाव नोंदणी,नावात बदल,पत्ता बदल,मतदार यादीत दुरुस्ती यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच 01ऑक्टोबर 2026 रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. नवमतदार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात २५० फॉर्म 6 चे वाटप करण्यात आले.
महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करून ‘सक्षम युवा मतदार, सक्षम लोकशाही’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
सदर अभियान प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील व मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
याप्रसंगी तहसील तथा नगर परिषद तर्फे वैभव पाटील,आनंद झांबरे ,संदीप शिंपी,तुषार शिंपी, आशिष परदेशी,प्रकाश सूर्यवंशी, दीपक गोसावी, ललित पाटील कम्प्युटर ऑपरेटर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल जे. पाटील व उपप्राचार्य प्रा. डॉ. अरविंद ए. बडगुजर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या मतदार नोंदणी अधिकारी प्रा. डॉ. मीना काळे,प्रा.डॉ. बालाजी पवार, प्रा. डॉ.संदीप कोतकर, प्रा. डॉ. उमेश गवई, प्रा. डॉ. अतुल पाटील, प्रा. विजय गाढे तसेच योगेश पाटील उपस्थित होते.





