महाराष्ट्रराज्य

सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्या भावा बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दिले आदिवासी संघटनेने निवेदन.

प्रतिनिधी – एरंडोल येथील भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य तर्फे सोशल मीडियावर राणी कुमावत व प्रेम कुमावत भाऊ व बहिण यांनी अश्लील भाषेत आदिवासी समाजा बद्दल सोशल मीडियावर पोस्ट केल्या बद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक जळगाव यांना पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड एरंडोल यांच्या माध्यमातून देण्यात आले.
निवेदनात नाशिक येथील राणी कुमावत व प्रेम कुमावत या भाऊ बहीण यांनी आदिवासी समाजा बद्दल शाब्दिक अश्लील भाषा वापरत व्हिडिओ काढून पोस्ट करत समस्त आदिवासी समाजाला अपमानित करीत अपशब्द वापरुन आक्षेपार्ह शब्द वापरले असल्याचे म्हटले आहे.त्या दोघ भाऊ बहिणीला डीवचनारा व्हिडिओ धारक हा इतर समाजाचा असून त्या व्यक्ती विरोधात कुमावत यांनी गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे.शेवटी आदिवासी समाजाला खालच्या दर्ज्याची वागणूक देत आदिवासी समाजाची इज्जत,औकात काढल्याने सदर वक्तव्य हीन दर्जाचे असून संविधानाच्या कलमा नुसार अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आदिवासी संघटना जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख दिपक अहिरे,तालुकाध्यक्ष भैया मोरे,सोशल मीडिया जिल्हा प्रमुख सागर वाघ,युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे,एरंडोल शहर कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण जावळे,मधुकर सोनवणे, दिपक मोरे,वासुदेव भिल यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button