जळगावमहाराष्ट्र

देशाच्या पायाभरणीत श्री विश्वकर्मांच्या वंशजांचे मोलाचे योगदान आमदार अमोल दादा पाटील

प्रतिनिधी एरंडोल: देशाच्या पायाभरणीत श्री विश्वकर्मांच्या वंशजांचे योगदान अतुलनीय असून रस्ते, पूल व विविध विकासात्मक कामांमध्ये या समाजाचे मोलाचे योगदान आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार या नात्याने आपले योगदान देणे हे माझे कर्तव्य असून विश्वकर्मा सुतार समाजासाठी सुसज्ज व प्रशस्त सभागृह उभारणीसाठी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार अमोल दादा पाटील यांनी केले.
ते येथील श्री विश्वकर्मा सुतार समाज पंच मंडळ ट्रस्ट तर्फे आयोजित श्री विश्वकर्मा जयंती उत्सव प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अमोल दादा पाटील यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, उपनगराध्यक्ष सुनीता माळी, नगरपालिकेचे गटनेते प्रा. मनोज पाटील, नगरसेवक कृष्णा ओतारी, अनिल महाजन, नितेश चौधरी, मयूर महाजन, डॉ. एन. डी. पाटील, अमोल तंबोली, दीपक पाटील, महेश देवरे, गोपाल पाटील, शरद मराठे यांच्यासह माजी नगरसेवक व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विश्वकर्मा सुतार समाजातील ज्येष्ठ मान्यवर विनायक देवरे, निवृत्त पोलीस निरीक्षक रघुनाथ सुतार, दिलीप सुतार, निवृत्त वायरमन नानाभाऊ देवरे, निवृत्त अभियंता लक्ष्मण शेलार यांचा आमदार अमोल दादा पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचाही समाजातर्फे सन्मान करण्यात आला.
मनोज मिस्त्री यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी विश्वनाथ साळुंखे, उपाध्यक्ष दिलीप हिरे, सचिव दशरथ देवरे, खजिनदार दिलीप सुतार यांच्यासह सर्व पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार प्रवीण महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन निवृत्त पोलीस निरीक्षक रघुनाथ पांडुरंग सुतार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button