सामाजिक सभागृहाच्या माध्यमातून सर्व समाजाला न्याय देण्याचा
प्रयत्न.-आमदार अमोल पाटील.

प्रतिनिधी एरंडोल-शहरातील विविध समाजाला सामाजिक सभागृहाच्या माध्यमातून न्याय
देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल पाटील यांनी केले.आमदार अमोल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ दाभाडे मित्र परिवार,मरीमाता चौक मित्र मंडळ,नगरसेविका छाया दाभाडे यांचेवतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.भाजप
जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर अध्यक्षस्थानी होते.
यावेळी नगरसेविका छाया दाभाडे यांचेतर्फे प्रभागातील महिलांना साड्यांचे वाटप
करण्यात आले तर आनंदभाऊ दाभाडे मित्र परिवार व मरीमाता चौक मित्र
मंडळाच्यावतीने आमदार अमोल पाटील यांनी लाडूतुला करण्यात आली.
आमदार अमोल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक
उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आमदार अमोल पाटील यांचेसह पदाधिका-यांचे आगमन होताचा फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले.यावेळी शहरातील विविध समाजाच्या सामाजिक सभागृहांचे लोकार्पण करण्यात आले.तसेच नवीन मटन मार्केट,रस्त्याचे खडीकरण व विविध सामाजिक सभागृहांच्या कामांचे आमदार अमोल पाटील यांचेहस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आमदार अमोल पाटील यांनी मतदारांना दिलेले आश्वासन प्रत्यक्ष
विविध विकासकामांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे सांगितले.शहरासह ग्रामीण भागात झालेल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारांनी नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या
उमेदवारांना विजयी केल्याचे सांगितले.आगामी काळात देखील मतदारसंघाची
विकासाची घौडदौड वेगाने सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला.यावेळी भाजपचे advt.किशोर काळकर,नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर,शिवसेनेचे गटनेते प्रा.मनोज पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,नगरसेविका छाया दाभाडे यांचेसह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.आनंदभाऊ दाभाडे मित्र परिवार,मरीमाता चौक मित्र मंडळ यांच्यावतीने मरीमाता चौकात आमदार
पाटील यांची वाढदिवसानिमित्त लाडूतुला करण्यात आली तर नगरसेविका छाया दाभाडे यांनी प्रभागातील महिलांना साड्यांचे वाटप केले.प्रभागातील महिलांनी आमदार पाटील यांचे औक्षण केले.कार्यक्रमास आमदार अमोल पाटील
यांच्या पत्नी मृणाल पाटील,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर
आमले,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील,उपनगराध्यक्षा सुनीता माळी,नगरसेविका आरती महाजन,पौर्णिमा
देवरे,कमल पाटील,डॉ.गितांजली ठाकूर,सत्यभामा पाटील,पल्लवी पाटील,मीनाक्षी पाटील,नगरसेवक अमोल तंबोली,मयूर महाजन,रवींद्र महाजन,कृष्णा ओतारी,अनिल महाजन,योगेश महाजन,डॉ.नरेंद्र पाटील,माजी नगरसेवक रुपेश माळी,बबलू
चौधरी,अतुल महाजन,महेश देवरे यांचेसह नगरसेवक,नगरसेविका,महायुतीचे
पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थितांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.माजी नगरसेवक पापा दाभाडे,सुरेश दाभाडे यांचेसह मरीमाता चौक मित्र मंडळाचे पदाधिका-यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.




