जळगावधार्मिकमहाराष्ट्र

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात.


प्रतिनिधी एरंडोल :-  शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थित डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी अभिवादन करत महामानवाच्या कार्याला आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा आढावा घेण्यात आला.
मार्गदर्शन करताना डॉ. पराग कुलकर्णी यांनी डॉ. आंबेडकर यांचा “शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे” हा संदेश विद्यार्थ्यांसमोर मांडला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडू शकते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. श्रद्धा शिवदे यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. जावेद शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन नरेंद्र पवार यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री तसेच सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button