श्री क्षेत्र चांदसर बु.ते पंढरपूर दिंडीचे एरंडोल येथे जल्लोषात स्वागत….

एरंडोल – श्री क्षेत्र चांदसर बु.ते पंढरपूर पायी दिंडीचे सोमवारी २९ जून २०२६ रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह, एरंडोल येथे आगमन झाले असता सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जयबीरसिंह पाटील व राजेश पाटील यांनी दिंडीचे व दिंडीतील वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.सदर पायी दिंडीचे आयोजन परमपूज्य नामदेव महाराज साबळे शिरगावकर व माजी आमदार तथा स्वातंत्र्य सैनिक स्व.मुरलीधर गंगाराम पवार यांच्या आशीर्वादाने सुरू करण्यात आली आहे.जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून पायी दिंडीची परंपरा कायम राखण्यात आली आहे.वारकऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जयबीरसिंह पाटील यांनी भोजन व्यवस्था केली होती.
दिंडीचा स्वागत सोहळा व वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जयबीरसिंह पाटील, राजेश पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.
याप्रसंगी डि.डी.एस.पी.महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, सेवानिवृत्त तहसीलदार अरुण माळी, डॉ.राजेंद्र चौधरी,जगदीश ठाकूर, ज्ञानेश्वर आमले, डॉ.सुरेश के.पाटील, ॲड.ओम त्रिवेदी, अभिजीत पाटील,आर.आर.पाटील,बी.एस.पाटील, नगरसेवक मयुर महाजन, कृष्णा महाजन,प्रवीण महाजन, बबलू पाटील, वासुदेव पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला व भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर ' जय हरी विठ्ठल ' च्या गजरात दिंडी कासोद्याकडे मार्गस्थ झाली.




