भारतरत्न, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त
आ. अमोेलदादा पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य, अत्यावश्यक उपकरणांचे वाटप.

प्रतिनिधी एरंडोल – येथील लक्ष्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रोशन भगवान मराठे आणि माजी उपनगराध्यक्ष प्रा. मनोज पाटील यांचेतर्फे भारतरत्न, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र. 1 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य आणि अत्यावश्यक उपकरणे वाटपाचा कार्यक्रम आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक़्रम आज (दि. 2) विद्यानगर, हनुमान मंदिराजवळ सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असून गरजूंनी लाभ घेण्याचे तसेच अधिक माहितीसाठी 8087807685, 8983941382 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
लक्ष्य फाऊंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मोफत आरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबीर राबविणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, दिव्यांगांना दैनंदिन उपयोगी आणि अत्यावश्यक साहित्य (उदा. कॅलिपर, कृत्रिम हात-पाय आदी) पुरविणे असे अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. दि. 10 ऑक्टोबर रोजी देखील संस्थेतर्फे मोफत साहित्य वाटप करण्यासाठी पूर्व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नोंदणी केलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आज (दि. 2) उपस्थित राहून साहित्य घेवून जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. आज आयोजित शिबीरात काठी, ट्रायसिकल, कमोड चेअर, श्रवणयंत्र आदी महत्वपूर्ण साहित्याचे वाटप होणार आहे. सदर साहित्य वाटपासाठी संस्थेकडून 40 लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. शिबीरात 200 ज्येष्ठ नागरिकांना लाभान्वित करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमाचा प्रभागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





