जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदेशीर रित्या गांजाचे सेवन करताना एरंडोल पोलिसांनी रंगेहात  पकडले ..

प्रतिनिधी एरंडोल –  येथे बाजारपट्टा परिसरात रमजान उस्मान पिंजारी वय ४० वर्षे राहणार फकीरवाडा एरंडोल याला बेकायदेशीरपणे चिलीम मध्ये गांजाचे सेवन करतांना एरंडोल पोलिसांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी ताब्यात घेतले. सदर इसमाकडे मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आले आहे.
          एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून येथील बाजारपट्टा परिसरात दोन इसम खाली बसून चिलीम द्वारे गांजाचे धुम्रपानाचे सेवन करीत असताना आढळून आले. एरंडोल  पोलिसांनी अचानक छापा टाकून रमजान पिंजारी यास जागीच पकडले. या धाडीत एक अर्धवट जळालेली चिलीम व काडीपेटी असे साहित्य मिळून आले.
            ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार हेड कॉन्स्टेबल ईश्वर शिंदे, रवींद्र तायडे दत्तात्रय ठाकरे या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button